बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांवर मोठ्या कारवाईची शक्यता, ईडीनं उचललं हे पाऊल!

मुंबई | अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना मुंबई पोलिसांना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबइ मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केला.

सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआय आणि ईडी मार्फत या प्रकरणाचा तपास आणि चौकशी सुरु आहे. ईडीने वारंवार अनिल देशमुखांना चौकशीला बोलावलं मात्र ते चौकशीला सतत गैरहजर राहीले.

चौकशीला हजर रहाण्यासाठी त्यांना तब्बल पाचवेळा समन्सही बजावले. मात्र एकदाही अनिल देशमुखे आले नाही. त्यामुळे अखेर अनिल देशमुख हजर रहात नाही आणि चौकशीला सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीनं केलाय. तसेच ईडीनं आयपीसी कलम 174 अन्वये मुंबई दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून देशमुखांविरोधात कारवाई करावी अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, 29 सप्टेंबर रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना दोन वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र ते ईडीसमोर आले नाही.

थोडक्यात बातम्या- 

स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं, तुमचं लक्ष कुठे असतं?- अमृता फडणवीस

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More