बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरेरावीची भाषा करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल- प्रभाकर देशमुख

दहिवडी | महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला मतं दिली नाहीत म्हणून म्हसवडकरांना उरमोडीचं पाणी देणार नाही, असं म्हणण चांगल्या लोकप्रतिनिधीचं लक्षण नाही, असं म्हणत माण- खटावचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी म्हणत जयकुमार गोरेंवर निशाणा साधला आहे.

आरेरावीची भाषा किती दिवस सहन करायची? अरेरावी करणाऱ्यांना जनता त्यांची योग्य जागा दाखवून देईल.  आता जे काही करायचंय ते माण-खाटावच्या जनतेसाठी, माण-खटावच्या विकासासाठीच करायचं आहे, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

तरूणांनो, तुमचे पुढचे 10 दिवस मला द्या. मी पुढची 5 वर्षे तुमची सेवा करण्यासाठी देतो, असा शब्द प्रभाकर देशमुख माण-खाटावच्या तरूणांना दिला आहे.

स्वत:चा पराभव समोर दिसत असल्याने विरोधक माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे माझी तक्रार केली. मात्र त्यातून काहीही साध्य झालं नाही. माझी संपत्ती सरकारच्या वेबसाईट उपलब्ध आहे. ती सगळ्यांना पाहण्यासाठी खुली आहे. त्यामुळं विरोधकांनी रडीचा डाव खेळणं बंद करावा, असंही प्रभाकर देशमुखांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More