महाराष्ट्र सांगली

आरएसएसकडे युद्धासाठी लागणारी सर्व हत्यारे- प्रकाश आंबेडकर

सांगली | आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे. तसेच आरएसएसकडे युद्धासाठी वापरली जाणारी सर्व हत्यारे आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकर बोलत होते.

सध्या देश धोकादायक वळणावर आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे जनतेने विचार करुन मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

भाजपने साध्वी प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी दिली. अशा घृणास्पद मानसिकतेच्या पक्षास सत्तेतून बेदखल करा, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-संजय राऊत म्हणतात, साध्वी प्रज्ञासिंह यांची व्यथा आपण समजून घेतली पाहिजे

-ज्यांना 10 वर्ष पुण्यात मेट्रो आणता आली नाही त्यांनी श्रेयासाठी भांडू नये-गिरीश बापट

-रावसाहेब दानवेंना सर्वात मोठा धक्का; बच्चू कडूंनी घेतला हा निर्णय

-सभेत काळा मोजाही न चालणारे सरकार घाबरले आहे- सुप्रिया सुळे

-मला ‘मुन्नाभाई’ म्हणून हिणवता मात्र तुम्ही तर ‘भाई’ आहात- सुजय विखे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या