मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर झालेले बलात्काराचे आरोप असो किंवा भ्रष्टाचाराचे, विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना कणा नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘उद्धव ठाकरे हे या आधीच्या पाच वर्षातही सत्तेत होते म्हणुन त्यांना प्रशासनाबद्दल माहिती नाही असं अजिबातच नाही, फक्त आता त्यांना कणा नाही त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांच्या भेटीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘उद्धव ठाकरे यांना कणा नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करावं. तसेच हे सरकार क्रिमिनल असून नविन सरकार महाराष्ट्रात यावं’, अशी इच्छा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
शरद पवार-अमित शहा भेट खरोखर झाली का?; अमित शहांचं सर्वात मोठं वक्तव्य
संजय राऊतांकडून ‘अपघाती गृहमंत्री’ म्हणून उल्लेख, गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर पाहा काय झालं!
शरद पवारांनी अहमदाबादमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली?; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
“शरद पवार साहेब कधी कोणाला भेटतील याचा काही नेम नाही”
अजित पवार यांचा खासदार संजय राऊत यांना मोठा इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.