पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

पंढरपूर | पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार आहे तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू, असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते. 

मीरज दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर दाखल असलेले आरोप मागे घेण्यात आले आहेत. या मुद्द्यावरुन आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं. 

भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना काय नाटकं करायचीत ती करावी. येत्या ऑक्टोबरनंतर ते मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन

-…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!

-भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

-असशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही!