Top News

प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं

मुंबई |  मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी दोषी असल्याचा ठपका लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांनी चौकशी अहवालात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर ठेवला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मेहतांना घरचा रस्ता दाखवला.

विरोधी पक्ष गेली 4 वर्ष मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणी करत होता मात्र मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मेहतांची खुर्ची काढून घेतली.

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश मेहतांना डच्चू देईन मुंबईतून अ‌ॅड. आशिष शेलार यांना कॅबीनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

दरम्यान, मेहतांना घरचा रस्ता दाखवून मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारचा कारभार कसा पारदर्शी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे

-“विरोधात असताना मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही”

-गेल्या महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ; या महिन्यात लागली मंत्रिपदाची लॉटरी

-आज मंत्रिमंडळ विस्तार अन् आजच्याच दिवशी खडसेंनी व्यक्त केली खदखद

-4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या