Top News राजकारण

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ईडीने घेतलं ताब्यात

ठाणे | शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने छापा टाकलाय. याशिवाय त्यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक आणि विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. तर ईडीने आता विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलंय.

विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालंय. विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरासोबत त्यांच्या कार्यालयामध्ये देखील ईडीने धाड टाकली. यामध्ये ईडीकडून मुंबई तसंच ठाणे परिसरातील 10 ठिकाणी शोधमोहीम सुरु केली.

ईडीच्या पथकाकडून सकाळी 8 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सध्या प्रताप सरनाईक देशाबाहेर गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांच्या घरी ईडीचा छापा का नाही; काँग्रेसचा सवाल

राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार- राजेश टोपे

शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्या घरावर ईडीचा छापा

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या