बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारने भलतंच करून दाखवलं, प्रविण दरेकरांची सरकारवर जोरदार टीका

मुंबई | विधीमंडळं ही लोकशाहीला जिवंत ठेवत असतात. सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी हे या सभागृहातुन राज्याची धोरणं आखत असतात. पण हेच लोकशाहीचं मंदीर जेव्हा काही विचित्र गोष्टींसाठी पुढे येतं तेव्हा समस्त राज्याची मान शरमेनं खाली जाते. लोकशाहीच्या या पवित्र ठिकाणी चुकीच्या व लज्जास्पद बाबी घडाव्यात ही गोष्ट सामान्य नसते.

राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा ढीग आढळुन आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासल्याची टीका राज्य सरकारवर होत आहे. कोरोनाकाळ असल्याने जनसामान्य नागरिकांना खुप मोठ्या तपासणी व सुरक्षेचा सामना करूनच आत सोडलं जात असताना या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कुठून हा प्रश्न आहे.

या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. ते म्हणाले कि, राज्यामध्ये निर्बंध सुरू आहेत आणि हा काय प्रकार समोर येतोय. पोलिस प्रमुखांच्या देखरेखीत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली इतकंच नाही, सहजासहजी कोणी हे कृत्य केलं त्याला शिक्षा झाली पाहीजे, असंही ते म्हणाले आहेत.

आम्ही करुन दाखवणार, असं शिवसेना म्हणते फक्त म्हणतचं नाही तर करुन पण दाखवते. आज अवघा महाराष्ट्र बघतोय यांनी केलेलं हे भलतंच काम अगोदर चंद्रपूरची दारूबंदी उठवली मग मंत्रालयात “मदिरा” आणून दाखवली. अश्या शेलक्या शब्दात दरेकरांनी ठाकरे सरकारला फैलावर घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या

भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवताना…; प्रीतम मुंडे, नवनित राणांचा शिवसेनेवर घणाघात

स्वपक्षातील खासदारामुळे भाजप अडचणीत, ‘या’ एका मागणीनं विरोधक आक्रमक

दीर्घकाळासाठी मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव राहणार – WHO

आता ‘या’ दिवशी साजरा होणार ‘राष्ट्रीय भालाफेक दिन’

“…तोपर्यंत RSSचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More