बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर….- प्रविण दरेकर

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. यावरून अनेक नेत्यांनी आपलं मत व्यक्त केली आहेत. अशातच विधान परिषदेचे प्रविण दरेकर यांनीही यावरून टोला हाणला आहे.

राष्ट्रपती कधी करणार आता करणार की, पुढच्या निवडणुकीनंतर करणार, आता राष्ट्रपती करायच म्हटलं तर सत्ता भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे राष्ट्रपती करायचं झालं असेल तर प्रशांत किशोर हे मोदींना भेटून आलेत का?, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना प्रविण दरेकरांनी पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं.

आमच्या काल ही नेत्या होत्या, आज ही आहेत आणि उद्या ही राहतील. पंकजा मुंडे नाराजी दूर झाली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी थोडी असेल तर त्यांची देखील नाराज निश्चित दुर केली जाईल, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. मात्र शरद पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडलंय हे मला माहित नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ड्रायव्हरला दिलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे सुजैन खान होतेय ट्रोल, पाहा व्हिडीओ!

महाराष्ट्रातील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी वाचा एका क्लिकवर 

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबद्दल मला काहीच माहीत नाही’; अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

“कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे संजय राऊतांनी आधी निश्चित करावं”

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 22 कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More