बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बायको मुलं भेटायला येत नसल्याने कारागृहात कैद्याचा अन्नत्याग; पोलिसांनी केला हस्तक्षेप अन्…

औरंगाबाद | खुनाच्या गुन्ह्याखाली मागच्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीला त्याची बायको आणि मुलं भेटायला येत नसल्याने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील एका कैद्याने अन्नत्याग केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अन्नत्याग केल्यामुळे संबंधित कैद्याची तब्येत खालावली आणि त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काटकर तावर चव्हाण असं या आरोपीचं नाव असून या आरोपीची बायको आणि मुलं गेल्या वर्षभरापासून त्याला भेटायला येत नाहीत. तसेच फोनवर बोलत नाहीत. शिवाय सासरवाडीला संपर्क केला असता त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं असल्याचं त्याला सांगण्यात आल्यामुळे त्याने कारागृहात अन्नत्याग केला.

या प्रकरणात कारागृह प्रशासनाने हस्तक्षेप करत संबंधित आरोपीच्या बायको आणि मुलांशी संपर्क करून त्यांची भेट घडवून आणली. सासरवाडीतून आपल्या बायकोने दुसरे लग्न केल्याचं कळल्यामुळे 3 जूनपासून या आरोपीने अन्नाचा त्याग केला होता. त्यानंतर कारागृहातील अधिकार्‍यांनी त्याची समजूत काढली. पण तो ऐकत नव्हता, तसेच तब्येत खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण तो उपचारालाही प्रतिसाद देत नव्हता.

दरम्यान, काटकर आणि त्याची पत्नी व मुलांची भेट पोलिसांनी घडवून आणल्यानंतर त्याने अन्नग्रहण केलं. या सर्व घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांसह रूग्णालयातील कर्मचारी आणि डाॅक्टरही बुचकळ्यात पडल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या घरात

“मर्दासारखं लढत राहायचं की गुडघे टेकून शरण जायचं, याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

विद्यार्थ्यांना जीवन विमा व अपघात विमा संरक्षणासह परीक्षा शुल्क माफी; ‘या’ विद्यापीठाचा मोठा निर्णय

“भाजपचा एकही आमदार फुटला नाही, म्हणूनच दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न”

15 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत भाजपविरोधी आघाडीसाठी शरद पवार आज घेणार महत्वाची बैठक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More