पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था पिंजऱ्यातल्या वाघासारखी झाली आहे- दिवाकर रावते

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर | काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था पिंजऱ्यातल्या पोपटासारखी झाली आहे, असा टोला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी लगावला आहे.

 पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. संपूर्ण देशाचे प्रश्‍न समजून घेण्याची त्यांना संधी होती. त्यांच्यावर नेतृत्वाचा खूप विश्‍वास होता. सर्वच्या सर्व प्रश्‍नांची माहिती असलेले चव्हाणांचे नेतृत्व होते. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, असं ते म्हणाले.

मात्र  मुक्‍त संचार करणारा एखादा वाघ पिंजऱ्यात आणून ठेवल्यानंतर काय होईल, तशीच परिस्थितीत पृथ्वीराजबाबांची महाराष्ट्रात आल्यानंतर झाली असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, बाबांनी मुख्यमंत्री असताना अनेक सुंदर गाठी मारुन ठेवल्या आहेत, त्या आजही सोडता येत नसल्याची त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-आफ्रिदी म्हणे ‘तो मी नाही’; भारतीय प्रसार माध्यमांवर केला आरोप

-फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे, मेलो तरी मागे हटणार नाही- मराठा आंदोलक

-अशोक चव्हाण 2019ला लोकसभा लढणार नाही?

-भाजप आमदाराला गावकऱ्यांनी शिव्या घालत गावातून हाकललं!

-तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही मार खातो, डायलॉगबाजी बंद करा, संजय निरुपमांना फटकारलं