Top News

शेतकरी आंदोलनावर खासदाराचं असं भाषण, जे प्रत्येकाने पाहिलंच पाहिजे!

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस धार मिळत असल्याचं दिसत आहे. आज शेतकऱ्यांनी देशभर चक्काजाम करण्याचा निर्धार केला आहे. तिकडे लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गोंधळ पहायला मिळाला. यामध्ये आरजेडीचे राज्यसभेतील खासदार प्रा. मनोजकुमार झा यांचं भाषण चांगलंच लक्ष्यवेधी ठरलं.

मनोज झा यांनी शेतकरी आंदोलनावर बोलताना मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. आंदोलन जिवंत लोकशाहीचं उदाहरण असतं, मात्र आता आंदोलनांना वेगळ्याच नजरेतून पाहिलं जात आहे. मी कधी सीमेवर गेलो नाही, मात्र ते खड्डे, ते खिळे… असं चित्र मी तिथंही कधी पाहिलं नाही, असं ते म्हणाले.

तुम्ही कुणाशी लढत आहात, आपल्या शेतकऱ्यांशी???, शेतकरी कशासाठी लढत आहे?, आपल्या हक्कांसाठी लढत आहे. शेतकऱ्यांना हे दिलं ते दिलं सांगणं आधी बंद करा, तुम्ही आम्ही देणार कोण आहोत? देणारे तर ते आहेत. असंच सुरु राहिलं तर तुमच्या 303 आकड्यातील पहिला तीन आणि शून्य कधी गायब होतील, तुम्हालाही कळणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजप सरकारला दिला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही?- राज ठाकरे

कोण आहे ती बाई? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरे

शेतकरी आंदोलनावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं, म्हणाले…

‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या