Top News पुणे महाराष्ट्र

आनंदाची बातमी, पुण्यात आज अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या वाढली नाही तर आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त!

पुणे  |  पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. पुण्यात आज दिवसभरात 486 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे आता पुण्याची एकूण कोरोनाबाधित रूग्णसंख्या 17 हजार 228 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 6134 एवढी आहे. शहरातील 522 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आहे. पुण्यात आतापर्यंत 10 हजार जणांहून अधिक रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात 522 रुग्ण बरे झाले. यामुळे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या आज वाढली नाही. पुण्यात आतापर्यंत एकूण 10,451 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यात 350 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 99 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा; आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांना टोला

महत्वाच्या बातम्या-

बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळावे, मंत्री नवाब मलिकांची माहिती

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, भुजबळांच्या पाठपुराव्याला यश

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या