बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान, पुणे जिल्ह्यातही कोरोना पसरतोय हातपाय; मागच्या काही तासातील आकडेवारी धक्कादायक

पुणे | जगभरात सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरु असताना महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचं पहायला मिळत आहे. आता तर पुण्यासोबतच पुणे जिल्ह्यातही कोरोनानं हातपाय पसरायला सुरुवात केली असून गेल्या काही तासातील आकडेवारी चिंताजनक आहे.

पुणे जिल्ह्यात काल रात्री 9 वाजल्यापासून तर आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 150 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6303 वर पोहोचली आहे, तर पुणे जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 282 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. तेव्हापासून या आजाराचा पुण्यातील प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात देखील या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

महत्वाच्या बातम्या-

‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More