बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुणे महापालिकेकडं दीड रूपयाची लसीकरणासाठी सुई नसणं, हेच सत्ताधारी भाजपचं अपयश”

पुणे | देशभरात कोरोनाची दुसरी लाट स्थिरावण्यास कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा वाटा आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्र चांगली कामगिरी करत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची मागील काही महिन्यांपूर्वी कमतरता जाणवत होती. मात्र, आता लस आहे पण, लस टोचण्यासाठी सुईच नाही, असा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण फक्त सुईअभावी रखडल्यानं, पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण फक्त सुई अभावी बंद पडल्यानं पुणे मनपाचा भोंगळ कारभाराचं दर्शन घडवणारी घटना आहे, अशी टीका जगताप यांनी सत्ताधारी भाजपवर केली आहे.

राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी असलेल्या ‘अ’ दर्जाच्या पुणे महानगरपालिकेकडे 1.50 रूपयांची सुई नसावी यासारखे दुसरं दुर्देव काय?, असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला आहे. पुणे ही अ दर्जाची महानगरपालिका असून तिचं 8 हजार कोटींचं बजेट आहे, भौगोलिकदृष्ट्या मोठी मनपा आहे. फक्त सुईअभावी लसीकरण बंद पडावं हे पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. असं जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, पुण्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपने मागील 4 वर्षात कोणतेही चांगली कामं केली नाहीत. येणाऱ्या काळात पुणेकर यांना चांगली सुबुद्धी देतील. पुणेकर येत्या चार महिन्यात यांना बदलून काढणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्राला केली ‘ही’ विनंती!

बाबो! ‘मनिके मागे हिते’ गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडीओ

…तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पालकमंत्रिपदावरून हटवतील- छगन भुजबळ

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More