Top News पुणे महाराष्ट्र

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

पुणे | निवृत्त नौदल अधिकाऱ्यानं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता शिरुर लोकसभा मतदारसंघात देखील एका व्यंगचित्रानं वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निमित्ताने एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर हे व्यंगचित्र काढण्यात आलं आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत असताना खासदार महोदयांचं लक्ष मात्र मालिकांच्या चित्रिकरणाकडे लक्ष असल्याचं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. सध्या मतदारसंघातील अनेकांच्या स्टेटसला हे व्यंगचित्र झळकत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ. अमोल कोल्हे संसदरत्न असून त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. आम्ही जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असा बॅनर मेसेज तयार करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचं नाव आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज आपल्या स्टेटसला ठेवला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करुन राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले आहेत. निवडणुकीनंतर या दोघांमधून विस्तवही जात नाही. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचं विळ्या भोपळ्याचं वैर आहे, त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेलं स्टेटस-

महत्त्वाच्या बातम्या-

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड!

“मनोरंजन करण्यासाठी रियाचं आयुष्य पणाला लावू नका”

लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोनाची लागण

मदन शर्मा मारहाण प्रकरणी नवनीत राणांनी घेतली राजनाथ सिंग यांची भेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या