बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला 7 पोती शेंदूर, समोर आली तेजस्वी मूर्ती!

पुणे | नुकतंच पुण्यातील रास्ता पेठेतील श्री उंटाडे मारुती मंदिराच्या वज्रलेपनाचं काम पार पडलं. मारुतीच्या या मुर्तीवर जवळपास गेल्या 350 वर्षांपासून न काढलेला शेंदूर होता. हा शेंदुर जवळपास एक ते दिड फूट जाडीचा होता. हाच शेंदूर काढत त्याच्यावर वज्रलेपण करण्यात आलं आहे.

रास्ता पेठेतील प्रसिद्ध शिल्पकार अभिजीत धोंडफळे यांनी हे काम यशस्विरीत्या पार पाडलं आहे. श्री उंटाडे मारुतीच्या मुर्तीवरुन जवळपास 7 पोती शेंदूर निघाला आहे. जवळपास गेल्या 350 वर्षांपासून न काढलेला शेंदूर पुर्णपणे निघाल्यानंतर आतमध्ये अतिशय देखणी, सुबक आणि काळ्या पाषाणातील मुर्ती प्रकट झाली.

ही मुर्ती 5 फूट उंच आणि 3 फूट रुंद आहे. श्री उंटाडे मारुतीचा हा चेहरा मानवी असून अतिशय मोहक आहे. उंटाडे मारुतीच्या मुर्तीला भारदार मिश्या आहेत.

श्री उंटाडे मारुतीचा उजवा हात आशिर्वादपर वरती असून डाव्या हातात गदा आहे. मारुतीच्या दोन्ही पायांमध्ये कली झोपलेला आहे. या मारुतीने कलीवर विजय मिळवला असल्यांची भाविकांची श्रद्धा आहे.

पेशवाईच्या काळात पेशव्यांचे सेनाप्रमुख सरदार रास्ते यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे उंट येथे बांधले जात. यामुळे या मारुतीचं नाव श्री उंटाडे मारुती असं पडलं.

1908 साली सरदार श्रीनिवास मुरलीधर यांनी त्यांची जागा KEM हॉस्पिटलला दिली. 1953 साली या ट्रस्टची नोंदणी झाली आहे. येथील मुख्य ट्रस्टी सरपंच म्हणून ओळखले जातात. आता या ट्रस्टचे सरपंच प्रदिप मुरलीधर हे आहेत. येत्या 2 मार्च रोजी श्री उंटाडे मारुतीची पुन:प्रतिष्ठापणा होत आहे.

थोडक्यात बातम्या-

रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!

‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

‘भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन…’; पूजा चव्हाणची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल!

“मोदी हे फकीर आहेत, ते कधीही झोला उचलून हिमालयात जातील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More