Top News पुणे महाराष्ट्र

पुण्याचा अभिमानास्पद चिराग!; जेईई मेन्समध्ये पटकावला बारावा रँक

पुणे | जेईई मेन्स ही परीक्षा जगातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखली जाते. पुण्याच्या चिराग फलोरने जईई मेन्समध्ये संपूर्ण देशात बारावा रँक पटकवला आहे.

चिराग दिल्लीतील आकाश इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेत होता. चिरागला जेईई मेन्स या परीक्षेमध्ये 300 पैकी 296 गुण मिळवून देशात बारावा रँक तर दिल्ली एनसीटीमध्ये तो प्रथम आला आहे. चिरागने पुण्याला आणि इन्स्टिट्यूटला अभिमान वाटावा अशी कामगीरी केली आहे. आकाश एज्यूकेशन सर्विसेस लिमिटेडचे एइएसएल संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश चौधरी यांनी आकाशचे अभिनंदन केले आहे.

चिरागने मिळवले यश हे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जेईई मेन्स ही परीक्षा एनआयटी, आयआयआयटी व सीएफटीआयमधील प्रवेशांसाठी पात्र आहे. या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी चिरागने अथक मेहनत घेतली आहे.

या संपूर्ण प्रवासादरम्यान त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे शिक्षक आणि पालक यांना या यशाचे सर्व श्रेय दिले पाहिजे. तसेच त्याच्या पुढील वाटतचालीसाठी आकाश चौधरी यांनी चिरागला शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे हल्ल्याचं समर्थन”

‘कंगणा राणावतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला?’; पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

पुणे जिल्ह्यात एका दिवसात 4 हजाराहून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

‘…तेव्हा बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी का केली नाही’; रोहित पवारांचं पासवान यांना पत्र

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या