पंजाब | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यासंदर्भात मोहाली पोलिसाकडून एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.
31 डिसेंबर रोजी रस्ता दाखवणाऱ्या एका नकाशांवर अमरिंदर सिंह यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर चिकटवल्याचं समोर आलं. याशिवाय अमरिंदर सिंह यांनी मारणाऱ्या व्यक्तीला 1 दशलक्ष डॉलरचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं.
यासंदर्भातील माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
31 डिसेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह मोहालीच्या दौऱ्यावर होते. याच वेळी पोलिसांना हे पोस्टर चिकटवण्यात आल्याचं दिसून आलं होतं.
थोडक्यात बातम्या-
“राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार”
मुकेश अंबानींना मोठा धक्का; सेबीने रिलायन्सला ठोठावला 25 कोटींचा दंड
“हिंदू देशविरोधी असू शकत नाही मग गांधींची हत्या करणारा गोडसे कोण होता?”
“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि कायम राहतील”
“तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?”