बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवलाय”

मुंबई | आज देशातील राजकीय हालचालींना मोठा वेग आल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणूक 2022 ची घोडदौड सुरु असून मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

पंजाबमधील एकूण 117 विधानसभा जागांवर अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र पहायला मिळतं. पंजाब निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी 82 जागांवर आघाडीवर आहे. अशातच आता पंजाबमधील सुरु असलेल्या मतमोजणीवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे. पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यांचं ट्विट सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

दरम्यान, आप 51 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. भाजप केवळ 6 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय साद 20 जागांवरही पुढे आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत असल्याचे दिसत नाही.

 

थोडक्यात बातम्या – 

Up Election Result 2022: पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लाॅप शो

UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा

“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

UP Election Result 2022: निकालापूर्वी अखिलेश यादव याचं ट्विट चर्चेत

“छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More