बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Punjab New Chief Minister: भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक 2022 पार पडली. या निवडणुकीचे अद्यापही पडसाद पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील हालचाली सुरुच आहेत.

विधानसभा निवडणुकीत पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपची आघाडी आली. तर एका राज्यात ‘आप’ची सत्ता आल्याचं पहायला मिळालं. पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यामुळे सत्ता परिवर्तन घडलं आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आता नवा अध्याय सुरु होत आहे.

पंजाबमध्ये आपचे नेते भगवंत मान विजयी झाले आहेत. त्यामुळे सध्या पंजाबमध्ये जल्लोषाचं वातावरण असून परिवर्तन पहायला मिळत आहे. अशातच आज थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव असलेल्या खटकर कलान येथे भगवंत मान यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2022 ची जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. त्यामुळे राजकीय वातावरण पेटून निघालं होतं. आता भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकारमध्ये काय बदल पहायला मिळणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा; न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचे ताजे दर

‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनानं बॉलिवूडकरांना मारला टोमना, म्हणाली…

“राज्यातल्या अजून 10 नेत्यांना राजीनामा द्यावा लागणार”

‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी सुनावलं, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More