बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण आहेत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली | पंजाबच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काॅंग्रेसने चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी नेमके कोण आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

चरणजीत सिंग चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून ते पंजाबमध्ये दलित नेते म्हणून त्यांची ओळख आहे. चरणजीत सिंग चन्नी याचं वय 58 वर्ष आहे. तसेच पंजाबमध्ये चन्नी यांच्या नियुक्तीमुळे पहिल्यांदाच दलित समाजातील नेता पंजाबचं नेतृत्व करणार आहे. चरणजीत सिंग यांची अचानक निवड झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

येत्या सहा महिन्यांत पंजाबमध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे चरणजीत सिंग चन्नी हे अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्री म्हणून असणार आहेत. रणजीत सिंग चन्नी हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावांची जोरदार चर्चा चालू होती, पंरतु आज अखेर चन्नी यांची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा केली

दरम्यान,  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पंजाबचं राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत होतं. त्यामुळे येत्या काही महिन्यांत पंजाबमध्ये राजकीय चित्र कशाप्रकारे बदलणार आहे यावर सगळ्यांच्या नजरा जडल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

…अन् जयंत पाटलांनी पुर्ण केली ‘त्या’ 6 वर्षाच्या चिमुकल्याची इच्छा

शब्दालय प्रकाशनच्या ‘पुस्तकवारी’ पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

‘आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More