अजस्त्र अजगराला पकडण्यासाठी जेसीबीनं इमारतीची तोडफोड

मुंबई | इमारतीत शिरलेला अजगर शोधताना मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका इमारतीतील रहिवाशांची चांगलीच दमछाक झाली. तब्बल 9 तासांच्या प्रयत्नांनंतर या अजगराला पकडण्यात यश आलं, त्यानंतर या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

अजगराच्या भीतीने हवालदिल झालेल्या रहिवाशांनी त्याला पकडण्यासाठी चक्क जेसीबीनं इमारतीची तोडफोड केली. त्यानंतर अजगराला पकडण्यात आलं. 

दरम्यान, मुलुंडमध्ये साप निघण्याचे प्रकार कायमचेच आहेत. मात्र आता अजगरही दिसल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.