बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बात निकली है तो दूर तक जायेगी”; रोहिणी खडसेंना भाजप नेत्याचा इशारा

जळगाव | ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर बोलताना ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात.
विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्याअगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल’ असं ट्वीट आमदार राम सातपुतेंनी केलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी खडसेंवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर सातपुतेंना उत्तर देताना खडसेंची मुलगी आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी खडा सवाल विचारला आहे. त्यानंतर रोहिणी खडसे आणि राम सातपुते यांच्यात ट्विटरवॉर रंगलं होतं.

‘अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?’ अशी घणाघाती टीका रोहिणी खडसेंनी केली आहे.

दरम्यान, त्यानंतर दुसर्‍यांदा ट्वीट करत “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे मंत्रिपद गेलं ना हो नाथाभाऊंचं. या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा, आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई? बात निकली ही है तो दूर तक जायेगी!’ असा टोला राम राजपूत यांनी लगावला आहे .

 

 

 

थोडक्यात बातम्या

“माझ्या पत्नी आणि मुलीलाही…”; पुतण्याच्या लसीकरणाच्या फोटोवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, कुटुंबातील 7 जणांवर केले कुऱ्हाडीने वार

पुण्यातील धक्कादायक घटना, अंत्यसंस्काराला तोबा गर्दी, मृताचे पाय धुवून पाणीही पिलं!

15 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

‘जय श्री राम’ घोषणा न दिल्यानं 10 वर्षाच्या चिमुरड्याला मारहाण; भाजप कार्यकर्त्याचं अमानुष कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More