मोदींचा हात आणि गळा कापू शकणारे अनेक लोक या देशात आहेत!

पाटणा | मोदींचा हात आणि गळा कापू शकणारे अनेक लोक या देशात आहेत, असं बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी म्हटलंय. त्या पाटण्यात बोलत होत्या.

‘मोदींकडे बोट दाखवाल तर त्यांचा हात तोडून टाकू’, अशी धमकी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी दिली होती. या धमकीला प्रत्युत्तर देताना राबडीदेवी यांनी ही टीका केली.

राबडीदेवी यांना सीबीआयची नोटीस आलीय. यावर आपण या संस्थांना भीक घालत नाही तसेच नोटीसला उत्तरही देणार नाही, असं राबडीदेवी यांनी सांगितलंय.