बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोव्यात राडा: ‘या’ स्टार खेळाडूच्या पुतळ्यावरुन नवा वाद

पणजी | गोव्यातील (Goa) समुद्रकिनारी असलेल्या कलंगुट गावातील एका उद्यानात फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) मोठा पुतळा उभारला आहे. या पुतळ्यावरुन गोव्यात नवा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या गोव्यात एकच खळबळ पहायला मिळत आहे.

तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि राज्यात फुटबॉल खेळाला पुढील स्तरावर नेण्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा भव्य पुतळा गोव्यात उभारण्यात आला असल्याचं, गोवा राज्य सरकारमधील मंत्री मायकल लोबो यांनी सांगतिलं. मात्र भारताच्या खेळाडूऐवजी पोर्तुगीज फुटबॉलपटूचा पुतळा उभारल्यामुळे गोव्यात आक्षेप घेतला जात आहे.

पोर्तुगीज असलेल्या रोनाल्डोचा पुतळा उभारणे, हा गोव्याचा अपमान आहे, असं म्हणत गोव्यातील आंदोलकांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. त्यामुळे गोव्यात सध्या नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डोनं या निषेधावर काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे आता गोवात हा पुतळा ठेवला जाणार की काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

Corona: राज्यात नवीन नियमावली जाहीर, ‘हे’ असणार नवे नियम

“माझा जास्त वेळ जुन्या गोष्टी शोधून त्या दुरुस्त करण्यातच जात आहे”

“दात पाडीन” म्हणत शिवसेना नेत्याची महिला पदाधिकाऱ्यावर आरेरावी

मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

‘…त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींचा पपलू केलाय’; किरीट सोमय्यांचा घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More