धक्कादायक!! विरोधी पक्षनेत्यांवर सरकारची पाळत, फोनही टॅप!

मुंबई | विरोधी पक्षनेत्यांवर सरकार पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय. आपले फोन टॅप होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना पृष्टी देणारा प्रकारही त्यांच्याच पत्रकार परिषदेत घडला. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेला साध्या वेषात हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडालीय. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. मात्र त्यांनी अशाप्रकारचे कोणतेही आदेश पोलिसांना दिले नसल्याचं स्पष्ट केलंय. आता विखे-पाटील याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत.