अहमदनगर महाराष्ट्र

…अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेन; राधाकृष्ण विखेंचा सरकारला इशारा

शिर्डी | महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतक-यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल, असा इशारा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठीाम विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करून सरकार मधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

राज्यात महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व कुठेही दिसत नाही. मुख्यमंत्री मुलाखतीतून शेतक-यांच्या प्रश्नाची थट्टा करी आहेत. कोरोना संकटात शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकार करु शकले. राज्यात युरीया खताचा काळा बाजार राजरोसपणे सुरू आहे. सोयाबीन बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली पण एकाही खासगी कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले नाहीत. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतक-यांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याची टिकाही आ.विखे पाटील यांनी केली. मुख्‍यमंत्री रोज म्‍हणतात सरकार पाडून दाखवा पण सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही तुम्‍ही तर जनतेच्‍या मनातुन केव्‍हाच पडले आहात, असा टोलाही राधाकृष्ण विखेंनी लगावला आहे.

राज्यातील शेतक-यांनी दुग्ध व्यवसाय अर्थिक संकट सहन करीत जीवापाड जपला आहे. मागील युती सरकारने समिती नेमून अनुदानाचा निर्णय केला. निर्णय प्रक्रियेत असलेले आज राज्यात मंत्री आहेत. मग आता शेतकरी विरोधी भूमिका काॽ आज पशुखाद्याचे दर वाढले आहेत पण १० रुपये तोटा सहन करून शेतकरी दूधधंदा करीत आहेत. शेतक-यांना आघाडी सरकारने २५ रूपये हमीभाव जाहीर केला. पण राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघानी शेतक-यांचे दूध १८ ते १९ रुपयांनी खरेदी करून दूध उत्पादकांची फसवणूक केली आहे. सरकार दूध भुकटीसाठी अनुदान देत असतानाही शेतक-यांना मिळत नाही मग या अनुदानाचे गौडबंगाल काय आहेॽ दूध अनुदानाचा या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे आ.विखे पाटील यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, अपघाताने आलेले सरकार राज्यात शेतक-यांसाठी कोणताही निर्णय घेत नाही. कोरोना संकट केवळ राज्यात नाही. पण कोरोनाच्या काळातही महाविकास आघाडी सरकार शेतक-यांच्या पाठीशी उभे राहीले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी…., राज्यपालांची महत्त्वाची सूचना

“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”

अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या