नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच अनिल अंबानींना राफेल कराराची माहिती दिली होती, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
राफेल कराराच्या 10 दिवस आधीच अनिल अंबानींना यासंदर्भात माहिती कशी मिळाली. मोदींनी याबाबतचं उत्तर द्यावं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी राफेल घोटाळ्यात सहभागी होते. ते जेपीसीपासून पळ काढत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, राफेल प्रकरणावरुन राहुल गांधीनी नरेंद्र मोदींना चांगलंच घेरल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
–पवार कुटुंबातील 4 सदस्य लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं
-मोदींच्या उपस्थितीत मंत्र्याने महिलेला ‘नको’ तिथे लावला हाथ
-MPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा घोटाळा; काँग्रेसचा सनसनाटी आरोप
–प्रियांका गांधीच्या रोड शोदरम्यान मोबाईल चोरीला, काँग्रेस कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन
-युतीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर ठेवल्या ‘या’ चार अटी