नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याघटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.
राहुल गांधी यांनी या घटनेवरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं. सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता, असं राहुल गांधी म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे- रितेश देशमुख
एकनाथ खडसेंचा पक्षांतराचा निर्णय निश्चित?; कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
…त्या दोषींना फाशी द्या, शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत- अक्षय कुमार
राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी
Comments are closed.