देश

आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही एक इंचही मागे हटू नका- राहुल गांधी

Photo Credit- Rahul Gandhi Twitter

नवी दिल्ली | आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्ही एक इंचही मागे हटू नका. कारण यामागे तुमचं भविष्य अवलंबून आहे, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाही. केंद्र सरकारने लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढून हे प्रकरण शांत करावं, असं राहुल गांधींनी म्हटलंय. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

शेतकरी आंदोलनासोबत काय सुरु आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरंतर नव्या कृषी कायद्यांमुळे काय नुकसान होईल, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समित्या संपतील, MSP नष्ट होईल. खरंतर सरकार शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेत आहे. परिणामी देशात महागाई वाढेल आणि आपण मजबूर होऊ, असं राहुल गांधी म्हणाले.

शेतकऱ्यांसोबत अत्याचार होत आहे. सरकार त्यांच्यासोबत बातचित करण्याऐवजी त्यांना मारत आहे. NIA ची धमकी देत आहे. सरकाला लवकरच या विषयावर शेतकऱ्यांशी चर्चा करुन कायदे रद्द करायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय काकांमुळे लागली”

सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस

“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही

“…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

धक्कादायक! गावाला येत नसल्याने पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या