‘न खाऊँगा, न खाने दूँगा’ म्हणणारा चौकीदार कुठं आहे???

नवी दिल्ली | बँक घोटाळ्यांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांंनी याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. 

‘आधी ललित मोदी, मग विजय मल्ल्या आणि आता नीरव मोदी फरार झाला. पण ‘न खाऊँगा, न खाने दूँगा’ म्हणणारा चौकीदार कुठं आहे?’ असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलाय. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. 

साहेबांच्या गुपचिळीचं कारण ऐकण्यासाठी जनता उत्सुक आहे, मात्र त्यांची गुपचिळी ते कोणाशी प्रामाणिक आहेत हे ओरडून ओरडून सांगत आहे, असंही राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.