बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…

नवी दिल्ली | अनेक मुद्द्यांवरून देशाच्या राजकारणात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. त्यात सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव असताना लडाख सीमेवरील पँगाँग सरोवरात चीन दुसरा पुल बांधत असल्याचं समोर आलं.

चीनी सेना दुसरा पुल बांधत असल्याची छायाचित्रे उपग्रहाद्वारे समोर आली. चीनचे उपद्व्याव थांबत नसताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या मुद्द्यावरून थेट केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

देशाच्या सुरक्षेशी आता तडजोड नको. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आता देशाचं संरक्षण करावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. तर काँग्रेसच्या (Congress) इतर नेत्यांनी देखील केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.

दरम्यान, भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. डरपोक आणि मवाळ उत्तर उपयोगाचे नाही. पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे, असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊतांनी सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून ठेवलीय”

शिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर, ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार

“भाजप देशातील नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष”

‘तुम्ही म्हणाल तेव्हा जय श्री राम म्हणायला मी काही…’, सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

मोठी बातमी! सचिन वाझेंना न्यायालयाचा दणका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More