बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार”

मुंबई | काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस येत्या 19 जून रोजी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय करणार? कशा प्रकारे वाढदिवस साजरा करणार? असे अनेक प्रश्न पडले होते. परंतू या सगळ्या प्रश्नांच निरासरन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांचा वाढदिवस’संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.तसेच वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता. केवळ त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाहीत,असंही ते म्हणाले आहेत. तसेच पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात काँग्रेस नेते आणि पदाधिकारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

कोरोना काळात अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांना बेरोजगारीला समोर जावं लागल. असं असताना पंतप्रधानांनी या काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले.त्यामुळे देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून 2024 साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन- पंकजा मुंडे

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

‘…अन्यथा रस्त्यावर उतरू’; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

शिवसेनेचा वर्धापन दिन कशा पद्धतीने साजरा होणार?; अनिल परब यांनी दिली माहिती

‘….तर काँग्रेस पक्ष आडवा येईल’; भाई जगताप यांचा शिवसेनेला इशारा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More