बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात

पुणे | पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आज संध्याकाळी पुण्यात अचानकच पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कालही पु्ण्यातील काही भागामध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाला होता. तसेच आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने अखेर संध्याकाळी पावसाने मेघगर्जनेसह पु्ण्यात हजेरी लावली.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर काही भागात यलो अलर्टही जारी करण्यात आला होता. त्यातच आता पुण्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ऐनवेळी धमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच अवघ्या काही वेळातच पुण्यातील रस्ते जलमय झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं यापुर्वीही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तसेच आता दिवाळीनंतरही पाऊस पडत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. तसेच काढणीला आलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पण असं असलं तरी या पावसामुळे हरभरा आणि गव्हाला पाणी देण्याचं काम शेतकऱ्यांना पडणार नाही, तसेच त्याचा फायदा होणार आहे.

एकीकडे महाराष्ट्रात उसतोडणी सुरू असताना आता अचानक येत असलेल्या पावसामुळे उसतोडणी थांबेल त्याचबरोबर शेतात आता वाहने फसण्याची शक्यता असल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांचं ऐन उसतोडणीच्या तोंडावर संपुर्ण तोडणी लांबणीवर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

‘या’ बड्या शिवसेना नेत्यासह विश्वास नांगरे पाटीलही किरीट सोमय्यांच्या रडारवर

अमरावती हिंसाचार घटनेवरून महिला व बालविकास मंत्र्यांनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला

देश कोरोनामुक्तीच्या वाटेवर, पहिल्यांदाच कोरोनामुक्तीच्या दराने गाठला उच्चांक

‘शांततापुर्ण वातावरणातील आंदोलन सरकार दडपत असेल तर…’, दरेकरांचा गंभीर इशारा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, ‘या’ चेहऱ्यांना मिळाली मोठी संधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More