बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् बेस्ट बसच्या ड्रायव्हर काकांनी बसमध्येच उघडली छत्री, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच आता मुंबईतील ड्रायव्हर काकांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा फारच रंगली आहे.

या व्हिडीओमध्ये मुंबईतील एक बेस्ट बसमध्ये पावसाची गळती होत असल्याचं दिसत आहे. यामुळे ते पाणी ड्रायव्हरच्या अंगावर पडत होतं. यामुळे ड्रायव्हरने बेस्ट बसमध्येच छत्री उघडली. विशेष म्हणजे ही एसी मिनी बस आहे. दोन वर्षांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात या मिनी बस दाखल झाल्या आहे. कमी पैशात गारेगार प्रवास अशी या बसची खासियत आहे.

पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरात मंगळवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबईत पावसाने धुमशान घातले आहे. लॉकडाऊनची निर्बंध हटवल्यामुळे बेस्ट वाहतूक जोमाने सुरू झाली आहे. मात्र मुंबईकरांची खास असलेल्या बेस्ट बसला पावसाचा फटका बसला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More