बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमच्या एवढं महाराष्ट्रासाठी कोणी केलं नाही- राज ठाकरे

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. आज मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा होतोय. यावेळी बोलताना मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. आमच्या एवढं महाराष्ट्रासाठी कोणी केलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या शस्त्रक्रियेला 2 महिने पूर्ण, शस्त्रक्रिया भयानक होती. जवळचे, बाहेरच्यांनी दिलेल्या त्रासामुळे शस्त्रक्रिया झाली, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना राज ठाकरेंना अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच सत्ता हातात द्या टोल बंद करून दाखवू, असं राज ठाकरे म्हणालेत.

आपल्याला बदनाम करण्यासाठी काही राजकीय पक्ष जाणूनबुजून प्रयत्न करत आहेत. या अपप्रचाराला उत्तर द्या, असं राज ठाकरे म्हणालेत.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More