बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ईडीसारखी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय”

पुणे | राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झालं होतं आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडकलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतायत, याची मी वाट पाहतोय- राज ठाकरे

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा- राजेश टोपे

आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं चोरालाही फुटला पाझर, चोरलेलं बाळ परत आणून दिलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More