कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे.
कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमकिा घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
निसर्गाची हानी न होता उद्योग आणि प्रकल्प उभे करून स्थानिक तरुणांची प्रगती कशी होईल ह्याचा विचार करून सरकारने धोरण ठरवायला हवं हे मी आपल्याला सुचवू इच्छितो. सरकारने ह्या संदर्भात जर सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.
पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू. आपण ह्या माझ्या म्हणण्याचा योग्य तो विचार कराल आणि राज्याच्या दीर्घकालीन हिताचा निर्णय घ्याल अशी मी आशा करतो, असंही राज ठाकरे म्हणाले.
कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘ रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला.राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी. @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/UdOuZPo4gk
— Raj Thackeray (@RajThackeray) March 7, 2021
थोडक्यात बातम्या-
‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं
…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”
न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट; पूजेचे फोटो केले शेअर
गोपीचंद पडळकरांनी आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, म्हणाले…
Comments are closed.