बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

पुणे | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीएक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

आजच्या तारखेला तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत याच जिल्ह्यांचा सत्तर टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलंय. तसचे आपण लसीकरणावर जोर देऊयात त्यामुळे तिसऱ्या लाटेची दाहकता जाणवणार नाही, असंही राजेश टोपे म्हणालेत.

पुण्यात सध्या 12413 , सातारा जिल्ह्यात 6328, मुंबईत 4273, रत्नागिरी जिल्ह्यात 1081 आणि अहमदनगरमध्ये 4975 सक्रिय रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 125 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

भररस्त्यात गाडीवर कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो”

‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More