बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन्यथा आपल्याला अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल- राजेश टोपे

मुंबई | कोरोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे स्वयंशिस्त पाळलीच पाहीजे. अन्यथा अनलॉकचा विचार आपल्याला सोडून द्यावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

नागरिकांनी शिस्त पाळली नाही, मास्क वापरले नाही, सोशल डिस्टंसिंग न पाळता संसर्ग पसरत राहिला, तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल. म्हणजेच कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण पुन्हा वाढेल. त्यामुळे स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

आमचं विचारमंथन चालू असतं, पण शिस्त पाळली आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा मर्यादित राहिला तरच नागरिकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने विचार करता येईल, असं राजेश टोपे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

चीनच्या पाठिंब्याने पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु- फारुख अब्दुल्ला

आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे- उद्धव ठाकरे

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत, त्यांच्यामुळे दिवसाला पाच कोटीचं नुकसान होत आहे”

…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More