बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मॉरिसची फटकेबाजी, 4 सिक्सर ठोकत 16 कोटींचा पहिला हप्ता वसूल, राजस्थानच्या विजयाची नौका पार!

मुंबई | अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर राजस्थान रॉयलने दिल्ली कॅपिटल्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. आयपीएलचा इतिहासात 16.25 कोटीला विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला दमदार विजय मिळवून दिला. डेव्हिड मिलर बाद झाल्यावर दिल्ली जिंकेल अशी चिन्हे होती. मात्र ख्रिस मॉरिसने कमाल करत सामन्याचं पारडं राजस्थानकडे वळवलं.

सर्वप्रथम टॉस जिंकून राजस्थानने दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. दिल्लीची सुरवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. तर अनुभवी अजिंक्य रहाणे देखील लवकर परतला. जयदेव उनाटकटने धारदार गोलंदाजी करत दिल्लीची फलंदाजी मोडीत काढली. त्यानं 4 षटकात 3 महत्वाचे गडी बाद केले. त्यानंतर कर्णधार रिषभ पंत आणि ललित यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रिषभ पंतने अर्धशतकीय खेळी केली. अखेर दिल्लीच्या संघाला 20 षटकात 147 धावा करता आल्या.

148 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरवात देखील खराब झाली. सुरवातीचे 3 खेळाडू लवकर बाद झाले. वोक्स आणि रबाडाने राजस्थानची टाॅप ऑर्डर मोडित काढली. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियाने चांगली भागेदारी केली. डेव्हिड मिलरने 43 चेंडूत 63 धावा करत राजस्थानला विजयाच्या जवळ घेऊन आला. त्यानंतर ख्रिस मॉरिस मैदानात आला. त्यानं 18 चेंडूत 36 धावा चोपल्या. या डावात त्यानं 4 गगनचुंबी षटकार ठोकले. अखेरच्या षटकात राजस्थानला 12 धावांची गरज होती. मॉरिस ने 2 षटकार ठोकत सामना आपल्याकडे वळवला.

दरम्यान, या सामन्यात जयदेव उनाटकटची 4 षटक महत्वाची ठरली. त्याच्या धारदार गोलंदाजीमुळे दिल्लीच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तर दिल्लीच्या गोलंदांजानी देखील या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती.

थोडक्यात बातम्या-

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

बच्चु कडुंची संकल्पना ऐतिहासिकच नाही, तर शेतकऱ्यांना समृद्धी देणारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुलीवर बलात्कार… बापानं असा घेतला बदला की काळजाचा थरकाप उडेल

महिन्याभरात कोरोना काय रुप घेईल?; नितीन गडकरींचा जनतेला मोठा इशारा

“सरकारने शालूच्या फोटोंवरील कमेंट्सवर लाॅकडाऊन लावावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More