राजस्थानमधील पराभवानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा संतप्त

भाजपाध्यक्ष अमित शहा

नवी दिल्ली | राजस्थानमधील दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा संतप्त झाल्याचं कळतंय. याप्रकरणी त्यांनी स्वतः लक्ष घातलंय. 

भाजपचे सरचिटणीस भूपेंदर यादव यांनी राजस्थानचा अहवाल अमित शहांकडे सोपवलाय. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना चर्चेसाठी बोलावलंय. 

राजस्थानमध्ये नेमकं काय झालं? राज्यात सत्ता असताना तिन्ही जागा भाजपला का गमवाव्या लागल्या? यावर भाजपमध्ये सध्या खलबतं सुरु आहेत. याप्रकरणी काही नेत्यांना कारवाईला किंवा अमित शहांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं.