पुणे महाराष्ट्र

ऊस दराबाबत राजू शेट्टी आक्रमक, पुण्यात काढणार मोर्चा

राजू शेट्टी

पुणे | रास्त आणि किफायत दर तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी 25 लाख टन दूधभुकटीचा बफर स्टॉक करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा पुण्यातील अलका चौकापासून साखर संकुलावर काढण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. सरकारने ऊस उत्पादकांना एफआरपी देण्याचे कबूल केले होते. साखरेचा दर प्रतिक्विंटल 2900 रुपये ठरवला आहे. त्यानूसार राज्य सरकारी बँकेकडून कारखान्यांना कर्जाची उचल मिळणार आहे.

बाजारातील स्थिती सकारात्माक आहे त्यामुळे लवकरात लवकर एफआरपीची रक्कम द्यावी, नाहीतर संघटना आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा!

-…तर महादेव जानकरांना नंदीबैलावर बसवून फिरवू- बच्चू कडू

मूक मोर्चा नव्हे आता गनिमी कावा; तुळजापुरात पडणार पहिली ठिणगी!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही अद्याप ठरलेलं नाही!

-मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रावसाहेब दानवेंकडून महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या