बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सहा महिन्यांपूर्वी केलेली राकेश झुनझुनवालांची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

मुंबई | प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. राकेश झुनझुनवाला यांनी  6 महिन्यांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. त्यांच्या निधनानंतर ती आता खरी ठरल्याचं दिसतंय.

राकेश झुनझुनवाला यांनी सीआयआयच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, हवामान, मृत्यू आणि मार्केटचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. हवामान केव्हा बदलेल, मरण कधी येईल आणि मार्केट कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही, असं ते म्हणालेत.

हवामान, मृत्यू, मार्केट, महिला याबाबत कोणीही भाकीत करू शकत नाही. मार्केट स्त्रीसारखं आहे, नेहमी प्रभावशाली, रहस्यमय, अनिश्चित आणि नाजूक, तुम्ही कधीही स्त्रीवर वर्चस्व गाजवू शकत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्ही मार्केटवर कधीही वर्चस्व गाजवू शकत नाही, असंही ते म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

“अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आता आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”

‘आपल्या देशाचं नाव बदलून…’; ‘या’ खेळाडूच्या पत्नीने नरेंद्र मोदींकडे केली मागणी

सोनं झालं स्वस्त; पाहा काय आहे आजचा भाव

राज्यातील ‘या’ भागाला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

शाहू-छत्रपतींच्या पोस्टरसमोर सिगरेट ओढत मुलींचा अश्लील डान्स!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More