महाराष्ट्र मुंबई

“राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार?”

मुंबई | CMO कडून उस्मानाबाद शहराचा उल्लेख धाराशीव असा करण्यात आलाय. विशेष म्हणजे CMOने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा फोटो आहे.

अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते असल्यानं काँग्रेसला हे मान्य आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आता यावरून भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार? सत्ता तुमची आहे, कोणी अडवलं तुम्हाला? की निवडणुका जवळ आल्या की फक्त नौटंकी?, अशी टीका राम कदम यांनी केली आहे.

ज्यानी राममंदिराच्या भूमिपूजनावर प्रश्न उपस्थित केले न्यायालयात निर्णय प्रलंबित केला त्यांच्यासोबत सत्ता?, असा सवाल करत राम कदम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

थोडक्यात बातम्या-

मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू- शरद पवार

धनंजय मुंडेंवर झालेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“घरात उकिरडा माजलाय आणि राष्ट्रवादीचे नेते जगाला शहाणपण शिकवतात”

“मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा”

जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या