बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, तुरूंगातील कैद्याचा दावा

चंढीगड | डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला तुरूंगात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा जामिनावर सुटलेला कैदी राहुलनं केलाय. बाबा राम रहीम बलात्कार प्रकरणी रोहतक तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

राम रहीमला तुरूंगात आणल्यापासून इतर कैद्यांवर निर्बंध घालण्यात आलेत. तो आल्यापासून इतर कैद्यांना मोकळेपणाने फिरू देत नाहीत, असंही त्यानं सांगितलं.

तुरूंगात बाबाला सर्व सुख-सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. तुरूंगातील एकाही कैद्यानं त्याला काम करताना पाहिलेलं नाही. त्याला इतर कैद्यांपासून वेगळं ठेवण्यात आलंय, असा आरोपही त्यानं केलाय.