पुणे महाराष्ट्र

दादा तुमचाही कार्यक्रम होणार, थोडा वेळ थांबा; राम शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार

अहमदनगर | तुमचाही कार्यक्रम होणार आहे, थोडा वेळ थांबा, असं प्रतिआव्हान अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दिलं आहे. 

लाल दिवा मिळाला की, धनगर समाजाच्या आरक्षणाचा बगल देणारे राम शिंदे कर्जत-जामखेड कसे जिंकतात ते बघतोचं, असं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं. श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या सांगता सभेत पवार आणि राम शिंदेंनी एकमेकांवर तोफ डागली. 

दादा तुमचा ज्यांनी विधानसभेला कार्यक्रम केला त्यांचाही कार्यक्रम होईल, थोडा वेळ थांबा, असं बबनराव पाचपुतेंकडे कटाक्ष टाकत शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. 

दरम्यान, श्रीगोंद्यातील अजित पवारांची सभा संपली की राम शिंदेंनी भाजप उमेदवाराच्या प्रचारात पवारांवर पलटवार केला.

महत्वाच्या बातम्या-

“आमचा 1 आमदार भाजपकडे गेला, तर त्यांचे 10 आमदार आमच्याकडे येतील”

-संभाजी पाटील निलंगेकरांसह अन्य 29 जणांची निर्दोष मुक्तता

-एखाद्या तरी सन्यासी व्यक्तीला ‘भारतरत्न’ द्या- बाबा रामदेव

-“काँग्रेसकडं चेहरा नाही, त्यामुळेच ‘चाॅकलेट’ चेहरे पुढं केले जात आहेत”

-‘डोकं शांत ठेवा’ शरद पवारांचा उदयनराजेंना सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या