महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना

मुंबई | राम मंदिराचा प्रश्न ऐरणीवर असल्याने या प्रश्नावरून शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झाला आहे, असा घणाघात शिवसेनेनं अग्रलेखात केला आहे.  

ज्या रामाने सध्याचे ‘अच्छे दिन’ दाखवले त्यास फुटबॉलप्रमाणे इकडून तिकडे उडवले जात आहे. निवडणुका जसजशा जवळ येतात तसा हा फुटबॉलचा खेळ रंगत जातो, अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे. 

दरम्यान, मंदिराचे सर्व पर्याय संपल्यावर संसदेच्या माध्यमातून मंदिर उभारण्याचे प्रयत्न करू, असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं. त्यांचा हा मार्ग म्हणजे रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राममंदिराचा खेळ त्यांना आणखी दोन-चार निवडणुकांच्या मैदानात खेळायचा आहे, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत काळाच्या पडद्याआड

-पप्पा, चांगले आहेत की वाईट?; धोनीच्या मुलीचं उत्तर सोशल मीडियात व्हायरल

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ व्हीडिओवर एक रुपयाही खर्च नाही!

-चंद्रावर आहे गोठलेल्या स्थितीतील पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

-मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड जाहीर; कोण आहे पहिल्या क्रमांकावर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या