बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड

मुंबई | ‘रामायण’ या सुप्रसिद्ध पौराणिक मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. दिर्घ काळापासून ते आजाराने ग्रासले होते.  नंतर त्यांना चालायला देखील त्रास होत होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

रामानंद सागर यांची सुप्रसिद्ध पौराणिक मालिका ‘रामायण’ 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होत होती. घराघरात पोहोचलेल्या या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. सगळ्याच कलाकारांनी त्यांची भूमिका चोख बजावली होती. पण प्रेक्षकांना विशेष लक्षात राहिली ती रावणाची भूमिका आणि रावणाची नकारात्मक भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी.

अरविंद त्रिवेदी यांनी रामायण नंतर अनेक हिंदी आणि गुजराती सिनेमात देखील काम केलं होतं. तर ‘विक्रम और बेताल’ या मालिकेतूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. लॉकडाऊन काळात रामायण मालिका पून्हा एकदा दाखवण्यात आली. इतक्या काळानंतरही अरविंद त्रिवेदीच्या भूमिकेचं आणि कामाचं कौतुक झालं.

अरविंद त्रिवेदी यांच्या भाच्याने त्यांच्या निधनाची माहिती दिली. “गेल्या काही वर्षापासून ते आजारीच होते. अशातही त्यांना 3 वेळेस उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री 9.30च्या सुमारास त्यांनी त्यांच्या कांदिवलीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला,” अशी माहिती कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली आहे. अरविंद त्रिवेदींच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर दहानुकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“प्रत्येक नागरिकाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी”

आज जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल; कोणाचं पारडं होणार जड?

अन् ‘या’ केंद्रीय मंत्र्याने थेट शरद पवारांना नाकारली भेट; काय आहे कारण?

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More